
Hindustan Aeronautics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. हा स्टॉक दिवसाच्या सुरुवातीला 4 टक्क्यांच्या वाढीसह 3659 रुपये किमतीवर पोहचला होता.
स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.12 टक्के वाढीसह 3,743.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 रोजी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेणार आहेत. या बैठकीत कंपनी स्टॉक स्प्लिट चे प्रमाण आणि रेकॉर्ड तारीख निश्चित करेल. मागील एका महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 37.96 टक्के मजबूत झाले आहेत.
ज्या लोकांनी 1 वर्षापूर्वी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 90 टक्के वाढले आहेत. मार्च 2020 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 448 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आता हा स्टॉक 3659 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. गेल्या 3 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 710 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ही कंपनी मुख्यतः हेलिकॉप्टर आणि विमान बनवण्याचे काम करते.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.