
Hindustan Zinc Share Price | वेदांत ग्रुप ऑफ कंपनीचा भाग असलेल्या ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना तिसरा अंतरिम लाभांश वितरीत करु शकते. कंपनीने जर लाभांश जाहीर करण्याच्या प्रस्तावावर जर शिक्कामोर्तब केला तर त्यांची रेकॉर्ड तारीख 30 जानेवारी 2023 ही असेल. यामुळेच आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष हिंदुस्थान झिंक कंपनीच्या शेअरवर आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.32 टक्के घसरणीसह 353.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hindustan Zinc Share Price | Hindustan Zinc Stock Price | BSE 500188 | NSE HindZinc)
कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “चालू आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये तिसऱ्या अंतरिम लाभांशावर चर्चा करण्यासाठी 19 जानेवारी 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जर संचालक मंडळाने लाभांश घोषित केला, तर त्याची रेकॉर्ड तारीख सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 ही असेल. अशी माहिती कंपनीने सेबीला कळवली आहे.
हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीने मागील 12 महिन्यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 36.50 रुपये लाभांश वितरीत केला होता. आज हिंदुस्तान झिंक कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 6.32 टक्के घसरणीसह 353.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्क्यांनी अधिक वाढली आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये बोली लावली होती, त्यांना आतापर्यंत 21 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला असेल. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 371.70 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 242.05 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.