 
						Home Loan Benefits | घर खरेदी करण्याची स्वप्ने आधी फक्त पुरूष मंडळी पाहत होती. मात्र आता आर्थिक स्वातंत्र्य असलेली प्रत्येक महिला देखील तिच्या हिंमतीवर स्वत:चे घर खरेदी करते. अशा परिस्थितीत बॅंका महिलांना विशेष सवलती देतात. यात त्यांना व्याजापासून ते कर्जाच्या ईएमआय पर्यंत सुट दिलेली आहे. जर महिला डिफॉल्टर लिस्टमध्ये आली तर तिला मिळणारे डिफॉल्टरचे पॉइंट पुरूषांच्या तुलनेत कमी आहेत.
घर खरेदी करताना यात फक्त एकट्या पुरूषाची मेहनत नसते. घराचे स्वप्न संपूर्ण कुटूंबाने पाहिलेले असते. अशात अनेक महिला आपल्या पतीला गृह कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत करतात. त्यामुळे पती पत्नीने एकत्रीत विचाराने घर खरेदी केले तर त्याचे जास्त फायदे होतात. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे कर्ज घेतले तर तुम्हाला अनेक गोष्टींचा फायदा मिळवता येतो.
व्याजाचा दर फारच कमी
अनेक बॅंका महिलांठी विचार करतात. महिलेचे देखील घर खरेदीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांना मदत करतात. यात पुरुषाला ज्या व्याज दराने कर्ज दिले जाते ते कर्ज महिलेला देताना कमी व्याज दर आकारला जातो. यात 0.05 ते 0.1 इतका फरक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पती आणि पत्नी या दोघांनी आपल्या नावार एकच कर्ज घेतले तर त्यांना व्याजाचा दर कमी भरावा लागतो. हा दर 6.65 टक्के इतका कमी असतो.
व्याज अनुदानाची सुविधा
महिलांनी सक्षम व्हावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी शासन, बॅंका, वित्तीय संस्था अनेक योजना राबवतात. यात परिस्थितीनुसार कर्ज माफी आणि व्याज अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेचा यासाठीच काम करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला गृह कर्जाची मालक असावी अथवा कर्जाची सहअर्जदार असावी लागते. घराची सहमालक असलेल्या महिलेला 2.67 लाख अनुदान दिले जाते. तसेच जर महिला आर्थिक दृष्या गरिब असेल तर तिला जास्त अनुदान देण्यात येते. यात ६ लाखांचे कर्ज घेणारी महिला ६.६ टक्क्यांच्या सबसीडीला पात्र समजली जाते.
मुद्रांक शुल्क
जर महिला घर खरेदी करत असेल तर तिला लागणारा मुद्रांक शुल्क कमी असतो. मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्काचा दर तुमच्या मालमत्तेवर ठरवला जातो. यात पुरुषांना ६ टक्के तर महिलांना ५ टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागतो.
परतफेडीवर सवलत
जेव्हा कर्जाची प्रथम मालक महिला असते तेव्हा कर्ज फेडण्यास दिर्घ कालावधी दिला जातो. हा कालावधी प्रत्येक बॅंक आपल्या नियमांप्रमाने ठरवत असते. त्यामुळे काही ठिकाणी ३० वर्षे तर काही ठिकाणी हा कालावधी ७० वर्षांचा देखील असू शकतो. मात्र पुरुषांना २० ते ६५ वर्षांपर्यंतचाच कालावधी दिला जातो.
मोठ्या रकमेचे मिळते कर्ज
सर्व बॅंका पुरुषाच्या सर्विस नुसार त्याला कर्ज देत असतात. मात्र तुमची पत्नी सहअर्जदार असेल तर तुम्हाला जास्त रकमेचे कर्ज मिळवता येते. यात ३० लाख ते ५ कोटी एवढी रक्कम असू शकते. तसेच कर कपात होते. जर तुम्ही मुद्दल फेडली तर पुढे व्याजाच्या १.५ लाख किंमतीवर २ लाखांची कर सवलत मिळते. १९६१ च्या कलम ८० क आणि ४२ ब नुसार याचा फायदा होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		