3 May 2024 5:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

DCX System IPO | आयपीओ लाँच पूर्वीच शेअर ग्रे मार्केटमध्ये फुल्ल डिमांडमध्ये, किंमत 88 रुपये प्रिमियमवर, मालामाल होण्याचे संकेत

DCX System IPO

DCX System IPO| दिवाळीनंतर गुंतवणूकदारांना IPO मधून कमाई करण्याची अप्रतिम संधी मिळणार आहे. बेंगळुरूस्थित DCX Systems कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदार 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही कंपनी IPO द्वारे खुल्या बाजारातून 500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO इश्यूमध्ये 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये जारी केले जातील. त्याच वेळी, 100 कोटींची ऑफर फॉर सेल/OFS असेल ज्यात विद्यमान शेअर धारक त्यांचे काही शेअर्स बाजारात विकतील.

हा शेअर BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध केला जाईल. DCX कंपनी भारतातील इलेक्ट्रॉनिक उप-प्रणाली आणि केबल हार्नेस तयार करणाऱ्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे प्रमोटर्स NCBG होल्डिंग आणि वVNG टेक्नॉलॉजी ऑफर फॉर सेलमध्ये त्यांचे शेअर्स विकणार आहेत. IPO मध्ये 75 शेअर्सचा वाटा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, 15 टक्के वाटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला जाईल. किरकोळ गुंतवणूकदाराना 10 टक्के वाटा राखीव ठेवण्यात आला आहे. DCX कंपनीने या IPO साठी रनिंग लीड मॅनेजर म्हणून एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, अॅक्सिस कॅपिटल आणि सेफ्रॉन कॅपिटल यांना नियुक्त केले आहे.

IPO मध्ये शेअर्सची किंमत :
DCX कंपनीने या IPO मध्ये शेअरची किंमत 197 ते 207 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली आहे. या IPO मध्ये गुंतवणुकदारांना किमान एक लॉट खरेदी करणे बंधनकारक आहे. एका लॉटमध्ये एकूण 72 शेअर्स असतील. म्हणजेच गुंतवणूकदाराला किमान 14,904 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

GMP म्हणजे काय? :
DCX IPO च्या शेअरची ग्रे मार्केटमधे किंमत 88 रुपये प्रीमियम आहे. जर या GMP नुसार गणना केली तर IPO मध्ये शेअर्स सुमारे 295 रुपये वर सूचीबद्ध होतील. यातून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळेल यात शंका नाही. हे शेअर्स 11 नोव्हेंबर 2022 च्या आसपास शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध केले जातील.

IPO मधील पैसा कुठे वापरणार? :
IPO मधून जो पैसा कंपनी मिळवणार त्याचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय, हा पैसा उपकंपनी रॅनियल अॅडव्हान्स सिस्टीम्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचा भांडवली खर्च तसेच सामान्य कॉर्पोरेट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी खर्च केला जाईल.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
DCX कंपनीचे ग्राहक केवळ भारतात नाही तर परदेशातही पसरले आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीचे ग्राहक इस्रायल, यूएसए, कोरिया आणि भारतासह इतर 26 देशांमध्येही पसरले आहेत. यामध्ये काही फॉर्च्युन 500 कंपन्यांचाही समावेश होतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्टार्टअप्स देखील DCX सिस्टिम कंपनी प्रमुख ग्राहक आहेत. कंपनीने 2019-20 मध्ये 449 कोटी रुपये महसूल कमावला होता. त्याच्या पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-22 मध्ये कंपनीचा महसूल 56.64 टक्क्यांनी वाढून 1102 कोटी रुपयेवर आला होता. मार्च 2020 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1941 कोटी रुपये होता. 31 मार्च 2022 रोजी ऑर्डर बुकचा आकार वाढून 2369 कोटी रुपये झाला. मार्चपर्यंत कंपनीकडे 2369 कोटी रुपयांच्या ऑर्डर पेंडींग होत्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DCX System IPO is ready to launch and trading on premium price in gray Market on 28 October 2022.

हॅशटॅग्स

DCX System IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x