 
						Honeywell Automation Share Price | ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे कमालीची वाढ नोंदवली होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीचे शेअर्स काल 9 टक्के वाढीसह 41067.15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. म्हणजे एका दिवसात ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 3562 रुपये वाढले.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 41,250 रुपये ही नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. हनीवेल ऑटोमेशन इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 37504.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44322.70 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 39,151.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीचे शेअर्स 74000 टक्के वाढले :
‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 74750 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 1998 रोजी ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 54.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 मे 2023 रोजी हनीवेल ऑटोमेशन कंपनीचे शेअर्स 41067.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 22 मे 1998 रोजी हनीवेल ऑटोमेशन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.5 कोटी रुपये झाले असते.
20 वर्षांत दिला 17000 टक्के परतावा :
हनीवेल ऑटोमेशन कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 17070 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 मे 2003 रोजी ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 262 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 मे 2023 रोजी हनीवेल ऑटोमेशन कंपनीचे शेअर्स 41067.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.56 कोटी रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		