
Hot Stock | आज शेअर बाजारात सुरूवातील किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता, मात्र दिवसा अखेर शेअर बजार सावरला आणि हिरव्या निशाणीवर बँड झाला. सध्या शरद बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. म्हणून कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून काही दिग्गज तज्ञांनी निवडक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
या लेखात सर्व गुंतवणूक करण्या योग्य स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही या स्टॉकमध्ये शॉर्टटर्म ते लाँगटर्म कालावधी साठी पैसे लावू शकता. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी जो स्टॉक निवडला आहे, त्याचे नाव आहे, पॉवर मेक. फेब्रुवारी 2023 मध्ये देखील अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून या स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे.
पॉवर मॅक :
* तज्ञांचा सल्ला : तत्काळ खरेदी करा
* सध्याची किंमत – 4271
* अंदाजित लक्ष्य किंमत – 4930-4990
* गुंतवणुकीचा कालावधी – 6 ते 9 महिने
कंपनी काय करते?
पॉवर मॅक ही कंपनी अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणारी दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी मुख्यतः औद्योगिक बांधकाम, पायाभूत सुविधा बांधकाम आणि औद्योगिक सेवा प्रदान करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. या कंपनीची स्थापना 1999 रोजी झाली होती. या कंपनीचा मालमत्तेचे आधार मूल्य खूप जास्त आहे.
कंपनीची मूलभूत तत्त्वे
आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी पॉवर मॅक कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के घसरणीसह 4,271.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 3 वर्षात पॉवर मॅक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17-18 टक्के परतावा कमावून दिला आहे. याशिवाय कंपनीच्या विक्रीत देखील 18-19 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
पॉवर मॅक कंपनीचे इक्विटी मूल्य 15 कोटी रुपये आहे. यामध्ये कंपनीच्या प्रवर्तकांनी 64-65 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. पॉवर मॅक कंपनीत मोठ्या देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे लावले आहेत. त्यांचा गुंतवणूक वाटा 10-11 टक्के आहे. पॉवर मॅक कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 15-20 हजार कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.