25 March 2023 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

Hot Stock | हा शेअर कॅडबरीच्या किंमतीपेक्षा स्वस्त, फक्त 1 दिवसात 20 टक्के परतावा, तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार?

Hot Stock

Hot Stock| ब्रॉडकास्ट सॅटेलाइट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी डिश टीव्हीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली. मागील दोन ट्रेडिंग सेशन पासून डिश टीव्हीच्या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. काही शेअर बाजार तज्ञांचे मत आहे की, या शेअर मध्ये अचानक आलेल्या वाढीचे कारण म्हणजे कंपनीचे चेअरमन जवाहरलाल गोयल यांनी राजीना दिला आणि त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये अचानक एवढी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.

शेअरची ट्रेडिंग प्राईस :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिश टीव्हीच्या शेअरमध्ये बीएसई निर्देशांकावर वर 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. यामुळे शेअरची किंमत 18.44 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. डिश टीव्ही कंपनीचे मार्केट कॅप 3300 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारपर्यंतच्या व्यवहारात स्टॉक मध्ये हलकीशी प्रॉफिट बुकींग दिसून आली होती, तरी शेअरची किंमत दिवसा अखेर 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्सच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. मागील फक्त दोन दिवसांमध्ये डिश टीव्ही च्या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

अचानक स्टॉकमधील वाढीचे कारण :
डिश टीव्ही कंपनीने अचानक एवढी मोठी नोंदवल्यावर स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, कंपनीचे संचालक जवाहरलाल गोयल यांनी कंपनीच्या संचालक मंडळ आणि सर्व समित्यांचा राजीनामा सादर केला होता, परिमाण स्वरूप शेअर मध्ये सकारात्मक वाढ दिसून आली आहे. अचानक झालेल्या वाढीमध्ये कंपनीचा कोणताही हात नाही. स्टॉक मधील वाढ नैसर्गिक असून गुंतवणूकदारांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शेअर मध्ये वाढ झाली आहे.

संचालकांच्या राजीनाम्याचे कारण :
डिश टीव्ही कंपनीची सर्वात मोठी शेअरहोल्डर येस बँक आणि जवाहर गोयल हे आहेत. डिश टीव्हीच्या संचालक मंडळात प्रतिनिधीत्वावरून कायदेशीर वाद निर्माण झाला होत. येस बँकेची डिश टीव्ही कंपनीत 24 टक्के गुंतवणूक आहे, येस बँकेला डिश टीव्हीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करायची आहे. यासोबतच येस बँकने डिश टीव्हीचे संचालक जवाहर गोयल आणि इतर काही कॉमच्या पदावर आणि कार्यक्षमतेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता डिश टीव्ही च्या संचालकांनी राजीनामा देताच स्टॉक मध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock of Dish TV Share Price in upper circuit check details 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x