Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का?

Hot Stocks | शापोरजी पालोनजी ग्रुपचा भाग असलेल्या फोर्ब्स अँड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 723.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( फोर्ब्स अँड कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत फोर्ब्स अँड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 57 टक्के परतावा कमावून दिला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 223.10 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी फोर्ब्स अँड कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 796.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील चार वर्षात फोर्ब्स अँड कंपनीचे शेअर्स 457 रुपये वरून वाढून 796 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्के वाढली आहे. 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर 457.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 एप्रिल 2024 रोजी फोर्ब्स अँड कंपनीचे शेअर्स 723.90 रुपये किमतीवर पोहचले होते.

आज या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. शापूरजी पालोनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने फोर्ब्स अँड कंपनीचे 72.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 26.15 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. फोर्ब्स अँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 934 कोटी रुपये आहे.

मागील एका महिन्यात फोर्ब्स अँड कंपनीचे शेअर्स 53 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 473.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 एप्रिल 2024 रोजी फोर्ब्स अँड कंपनीचे शेअर्स 723.90 रुपये किमतीवर पोहोचले होते. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत फोर्ब्स अँड कंपनीने 71.72 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीचा एकूण नफा 10.26 कोटी रुपये होता. फोर्ब्स अँड कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 65 रुपये विशेष लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks Forbes and Company Share Price 26 April 2024.