काठमांडू : ‘बिम्सटेक’ संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडूत दाखल आले आहेत. सध्या बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड अशी एकूण ७ राष्ट्र बिम्सटेकचे सदस्य आहेत. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजे ‘बिम्सटेक’ संमेलन यंदा नेपाळची राजधानी काठमांडू’मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

या आधीच बिम्सटेक संमेलन भारतामध्ये गोव्यात आयोजित करण्यात आलं होत. काठमांडू येथे आज आणि उद्या असे सलग दोन दिवस हे संमेलन चालणार आहे. त्यानिमित्ताने आज रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सातही सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या बैठका तसेच एकमेकांशी मुलाखती पार पडतील. त्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात येईल.

‘बिम्सटेक’ मधील ७ सदस्य राष्ट्रांचा विचार केल्यास या देशांची एकूण लोकसंख्या ही १.५ अब्ज इतकी असून ती एकूण जागतिक लोक संख्येच्या तब्बल २१ टक्के इतकी आहे. तसेच या ७ सदस्य राष्ट्रांचा एकूण जीडीपी हा तब्बल २५०० अब्ज डॉलर इतका प्रचंड आहे.

Narendra modi arrived into kathmandu to attend bimstec summit 2018