
Hot Stocks | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात, ती कंपनी आपोआपच एक मल्टीबॅगर कंपनी बनून जाते. अशीच एक कंपनी NSE वर ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 33.30 रुपयांवर ट्रेड करत आहेत. वास्तविक, कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओसोबत झालेल्या करारानंतर दिसून आली आहे.
सॉफ्टवेअर कंपनी सुबेक्सच्या शेअर्समध्ये आज 20 टक्केची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर दिवसभर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. NSE वर कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ झाली आणि दिवसा अखेर शेअर्स 33.30 रुपयांवर बंद झाले. वास्तविक, कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओसोबत झालेल्या करारानंतर दिसून आली आहे.
काय करार झाला आहे?
ह्या सॉफ्टवेअर कंपनीने सांगितले की त्यांनी Jio Platforms सोबत AI ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म हायपरसेन्ससाठी भागीदारी केली आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार व्यवसायाची 5G सेवा मध्ये सुधारणा होईल. करारानुसार, जिओ प्लॅटफॉर्म क्लोज लूप नेटवर्क ऑटोमेशन, उत्पादन कार्यप्रदर्शन आणि ग्राहक अनुभव विश्लेषण सक्षम करण्यासाठी सुबेक्सच्या हायपरसेन्सच्या सहकार्याने जागतिक स्तरावर इतर टेलिकॉम कंपनीला त्याचा क्लाउड नेटिव्ह 5G कोर ऑफर करेल. जेपीएल आणि सुबेक्स यातील भागीदारी उद्योग ग्राहकांसाठी 5G सेवांमध्ये नवीन संधी प्रदान करते.
सुबेक्स स्टॉक आज बीएसईवर 27.70 रुपयांच्या आधीच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा तुलनेत 20 टक्के अप्पर सर्किटवर 33.30 रुपयांवर जाऊन बंद झाला. स्टॉक 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस आणि 100-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. परंतु 200-दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
एका वर्षात स्टॉक 44.59% वाढला :
एका वर्षात स्टॉक ने कमालीची वाढ दर्शवली आहे. स्टॉक मध्ये तब्बल 44.59 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे..आणि 2022 च्या सुरुातीला हा स्टॉक 38.56 टक्क्यांनी घसरला होता. तथापि, एका आठवड्यात स्टॉकमध्ये 26.62 टक्के वाढ झाली आहे. बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल 1,871.47 कोटी रुपये झाले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.