16 December 2024 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक ट्रेडिंग व्हॉल्युममध्ये मोठी वाढ, शेअर्स खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • HUDCO Share PriceNSE: HUDCO – हुडको कंपनी अंश
  • कंपनीकडून कर्ज सहाय्य प्रदान करण्याची घोषणा
  • RBI कडून NBFC-IFC म्हणून मान्यता मिळाली
HUDCO Share Price

HUDCO Share Price | हुडको या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये पाच दिवसांच्या सलग घसरणीनंतर शुक्रवारी जबरदस्त तेजी (NSE: HUDCO) पाहायला मिळाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीचे पाच दिवस हुडको स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. या काळात शेअरची किंमत 9 टक्क्यांनी घसरली होती. शुक्रवारी बीएसई आणि एनएसईवर हुडको कंपनीचे 3 कोटींपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. (हुडको कंपनी अंश)

कंपनीकडून कर्ज सहाय्य प्रदान करण्याची घोषणा
शुक्रवारी सकाळी हुडको कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 252.90 किमतीवर ओपन झाले होते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 9.15 टक्के वाढीसह 251.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच हुडको कंपनीला RBI कडून NBFC-IFC म्हणून मान्यता मिळाली आहे. या कंपनीने नुकताच प्रधानमंत्री आवास योजना-अर्बन 2.0 अंतर्गत 75,000 कोटी ते 1 लाख कोटी रुपयेपर्यंत कर्ज सहाय्य प्रदान करण्याची घोषणा केली आहे.

RBI कडून NBFC-IFC म्हणून मान्यता मिळाली
हुडको कंपनीला आरबीआयकडून ऑगस्ट 2024 च्या सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. मागील एका वर्षात हुडको कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 240 टक्के परतावा कमावून दिला आहे. हुडको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50200 कोटी रुपये आहे. हुडको कंपनीत भारत सरकारचा वाटा 75 टक्के आहे. हुडको स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 353.95 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HUDCO Share Price 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x