 
						HUDCO Share Price | हुडको या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने राजस्थान सरकारसोबत 1 लाख कोटी रुपये मूल्याचा करार केला आहे. ही बातमी जाहीर झाल्यानंतर हुडको कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. अनेक ब्रोकरेज फर्मने पोझिशनल गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( हुडको कंपनी अंश)
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी हुडको स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 314.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने हुडको कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 288 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काही दिवसात 344 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 12 जुलै रोजी या कंपनीच्या शेअर्सने 354 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 60 रुपये होती. हुडको कंपनीने राजस्थान सरकारसोबत केलेला 1 लाख कोटी रुपये मूल्याचा सामंजस्य करार राज्यातील गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करण्याबाबत आहे.
या करारानुसार हुडको आणि राजस्थान सरकार 5 वर्ष सोबत काम करणार आहेत. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 95 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात हुडको स्टॉक 145 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		