 
						ICICI Bank FD Rates | खासगी क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय बँकेने एफडीदरात (मुदत ठेवी) बदल केला आहे. बँकेचे नवे व्याजदर 17 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर हे व्याजदर लागू होतील. ज्येष्ठ नागरिकांना बँक 7.75 टक्के व्याज देत आहे. ICICI FD Interest Rates
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, बँकेत डोमेस्टिक एफडी उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. चला तर मग पाहूया बँकेच्या व्याजदरावर…
बँक किती व्याज देत आहे?
* 7 दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर बँकेला 3 टक्के व्याज मिळेल.
* बँक 30 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज देत आहे.
* बँक 46 दिवस ते 60 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के व्याज देत आहे.
* बँक 61 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज देत आहे.
* बँक 91 दिवस ते 184 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज देत आहे.
* बँक 185 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज देत आहे.
* बँक 271 दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहे.
* 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर बँक 6.70 टक्के व्याज देत आहे.
* बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज देत आहे.
* बँक 2 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांच्या एफडीवर 7% व्याज देत आहे.
बँक ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 15 महिने ते 2 वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		