
IFL Enterprises Share Price | आयएफएल एंटरप्राईसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 1.30 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. ( आयएफएल एंटरप्राईसेस कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या स्मॉल कॅप कंपनीने बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी आयएफएल एंटरप्राईसेस स्टॉक 4.62 टक्के वाढीसह 1.36 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
आयएफएल एंटरप्राईसेस कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी आयोजित केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीने भारतीय स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला बोनस शेअर्स आणि लाभांश वाटपा संदर्भात माहिती कळवली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 97 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10.67 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.04 रुपये होती.
आयएफएल एंटरप्राईसेस ही कंपनी मुख्यतः कपड्यांच्या रिटेल विक्रीचा व्यवसाय करते. याव्यतिरिक्त ही कंपनी A/4 पेपर, कोटेड आणि कॉपियर पेपर्स यांसारखे उत्पादने विकण्याचा व्यवसाय करते. नुकताच कंपनीच्या प्रवर्तकांनी खुल्या बाजारातून 1.83 रुपये प्रति शेअर किमतीवर 12.6 लाख शेअर्स खरेदी केले होते. यासह आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने 1 रुपये किंमतीचा राइट्स इश्यू देखील जारी केला होता. या कंपनीचा राइट्स इश्यू 27 मे 2024 ते 25 जून 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. सध्या आयएफएल एंटरप्राईसेस ही कंपनी आपल्या दुबईस्थित उपकंपनीद्वारे आंतरराष्ट्रीय कृषी वस्तू, रत्ने आणि मौल्यवान धातू क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची तयारी करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.