 
						IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग कंपनीचा IPO बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.83 पट सबस्क्राइब झाले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार IKIO लायटिंग कंपनीने 606.5 कोटी रुपये मूल्याचा IPO लाँच केला होता.
या IPO मध्ये 1,52,24,074 शेअर्सच्या ऑफरच्या विरूद्ध 10,40,31,096 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. IKIO लायटिंग कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवसा 8 जून आहे. IKIO Lighting IPO 6 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
IKIO लायटिंग GMP
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स 122 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा ट्रेंड पुढे असाच चालू राहिला तर IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स 413 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. IKIO लायटिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 270 रुपये ते 285 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.
IPO सबस्क्रिप्शन
उपलब्ध आकडेवारीनुसार IKIO लायटिंग कंपनीच्या IPO मध्ये गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 15.99 पट सबस्क्राईब झाला आहे. तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोट 5.92 वेळा पट आणि QIB श्रेणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1.37 पट सबस्क्राईब झाला आहे.
या IPO अंतर्गत IKIO लायटिंग कंपनीने 350 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. आणि 90 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. कंपनीने या IPO साठी शेअरची किंमत बँड 270 रुपये ते 285 रुपये निश्चित केली आहे. IKIO लायटिंग कंपनीने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अँकर गुंतवणूकदारांकडून 182 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		