5 May 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

SBI Bank Customers Alert | एसबीआय ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु, आता ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही

SBI Bank Customers Alert

SBI Bank Customers Alert | जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. एसबीआय लवकरच पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना नवीन सुविधा देणार आहे. तुमच्या घरातील सिनियर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

बँकेच्या नव्या योजनेंतर्गत बँकिंग एक्झिक्युटिव्ह कस्टमर केअर सेंटरमध्ये डोळ्यांच्या आयरिसद्वारे (IRIS Scanner) ग्राहकाची ओळख पटवता येणार आहे. एसबीआय ‘आयआरआयएस स्कॅनर’ ही ओळख सुविधा देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.

होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही
बँक एक्झिक्युटिव्हजवळ ‘आयरिस स्कॅनर’ची सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक प्रवर्गात येणाऱ्या ग्राहकांना घरच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. या सुविधेनंतर त्यांना त्यांच्या जवळच्या ‘बँक मित्र’ केंद्रातून पेन्शन काढता येणार आहे. एसबीआयने आपल्या ‘बँक मित्र’ ऑपरेटर्ससोबत ‘आयरिस स्कॅनर’ बसवण्याच्या पर्यायाची चाचणी घेत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक खातेदार आणि पेन्शनधारकांसमोरील आव्हाने कमी होतील.

फिंगर स्कॅन करताना तांत्रिक अडथळे
‘आयरिस स्कॅनर’च्या मदतीने कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यांच्या आयरिसद्वारे ओळख पटवता येते. आजकाल सर्व कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी अशाच सुविधांचा वापर केला जातो. अनेक ग्राहक पेन्शन काढण्यासाठी बँक मित्राकडे गेली होती. त्यावेळी त्या ग्राहकाच्या फिंगर स्कॅनची खात्री होतं नसल्याने त्यांना प्रचंड खूप त्रास झाला. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आयरिस स्कॅनर बसवण्याची शक्यता ही शोधली जात असल्याचेही बँकेने सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Bank Customers Alert on IRIS Scanner service check details on 22 April 2023.

हॅशटॅग्स

#SBI Bank Customers Alert(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x