 
						Income Tax Limit | अर्थसंकल्पापूर्वी करवसुलीच्या बाबतीत सरकार आणि करदाते या दोघांसाठीही आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार कर संकलन 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपये झालं आहे. परताव्यानंतर निव्वळ कर संकलन १२.३१ लाख कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा हे प्रमाण १९.५५ टक्क्यांनी अधिक आहे.
एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाचे 86.68% कर संकलन
कर संकलनातील या वाढीचा फायदा करदात्यांना अर्थसंकल्पात आयकर सवलतीच्या रूपात होऊ शकतो. कर संकलन चालू आर्थिक वर्षाच्या एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ८६.६८ टक्के आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात १४.२० लाख कोटी रुपये करवसुली होण्याचा अंदाज होता. ढोबळमानाने कॉर्पोरेट इन्कम टॅक्सच्या (सीआयटी) वसुलीत १९.७२ टक्के, तर वैयक्तिक प्राप्तिकरात (पीआयटी) ३०.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२.४० लाख कोटी रुपयांचा परतावा जारी
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, “१० जानेवारी २०२३ पर्यंतच्या कर संकलनाच्या सुरुवातीच्या आकडेवारीत सातत्याने वाढ दिसून येते. सीबीडीटीनुसार, या काळात प्रत्यक्ष कर संकलनात प्रत्यक्ष कर संकलन १४.७१ लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा २४.५८ टक्क्यांनी अधिक आहे. रिफंड अॅडजस्ट केल्यानंतर सीआयटी कलेक्शनमध्ये 18.33 टक्क्यांची निव्वळ वाढ झाली. १ एप्रिल २०२२ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत २.४० लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. वर्षागणिक हा आकडाही ५८.७४ टक्क्यांनी अधिक आहे.
यावेळी इन्कम टॅक्स सूट मर्यादा वाढवणार
यावेळी करवसुलीच्या उत्साहवर्धक आकडेवारीचा परिणाम २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात दिसू शकेल, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत सरकार यावेळी आयकर सवलतीची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढवू शकेल, अशी अपेक्षा आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		