13 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Gold Price Today | बापरे! आज सोनं-चांदीचे दर अजून महागले, लग्नसराईच्या दिवसात आज दर किती वाढले पहा

Gold Price Today MCX

Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात गुरुवार, 12 जानेवारी रोजी सोने-चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव ०.२१ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीच्या दरातही आज 0.58 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील व्यापार सत्रात एमसीएक्सवरील सोन्याचा दर 0.01 टक्क्यांनी किंचित वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीच्या दरात 0.51 टक्क्यांची घसरण झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर
वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव रात्री 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत 124 रुपयांनी 55 हजार 817 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता. सोन्याचा आज ५५,७९२ रुपयांवर व्यवहार सुरू झाला. ओपनिंगनंतर हा भाव एकदा ५५,८३० रुपयांपर्यंत गेला. पण नंतर त्यात किंचित घट झाली आणि ५५,८१७ रुपयांवर व्यापार सुरू झाला. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 8 रुपयांनी वधारून 55,720 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीचे दरही वाढले
एमसीएक्सवर आज चांदीचा भाव 395 रुपयांनी वाढून 68,368 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा व्यवहार आज ६८,३४९ रुपयांवर सुरू झाला. एकदा हा भाव ६८,३९० रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, काही काळानंतर मागणीअभावी ६८,३६८ रुपयांवर व्यापार सुरू झाला. मागील व्यापार सत्रात एमसीएक्सवर चांदी 363 रुपयांनी घसरून 68 हजार रुपयांवर बंद झाली होती.

काल सराफा बाजारात तेजी होती
दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३८,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 56,037 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही ६७७ रुपयांनी वधारून ६९,२१८ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र कल
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने मजबूत आहे, तर चांदीचे दर घसरले आहेत. सोन्याचा भाव आज ०.२८ टक्क्यांनी वाढून १,८८२.७५ डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आजही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ०.१८ टक्क्यांनी घसरून २३.५७ डॉलर प्रति औंसवर होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today MCX updates check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today MCX(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x