 
						INDIA Alliance | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भाजप आघाडीचे संयोजक बनवले जाईल, अशी सुरुवातीपासूनच अटकळ बांधली जात होती, पण आता नवीन बातमी समोर आली आहे. नितीशकुमार यांच्या ऐवजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयोजक केले जाऊ शकते. याशिवाय अन्य प्रमुख पक्षांच्या ११ नेत्यांना सह-संयोजकपदाची जबाबदारी मिळू शकते.
मुंबईत घोषणा होऊ शकते
मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत याची घोषणा होऊ शकते. इतकंच नाही तर या दरम्यान भाजप आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाऊ शकतं आणि दिल्लीत मुख्यालय स्थापन करण्याचीही घोषणा केली जाऊ शकते.
नितीशकुमार यांनी स्वत: स्पष्ट नकार दिला
जेडीयूच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, नितीशकुमार यांनी स्वत: संयोजक होण्यास बैठकीत स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्यावतीने काँग्रेसने आपल्या एका नेत्याची संयोजक पदी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात त्यांच्याकडून आली होती. तेव्हापासून खर्गे यांच्याबाबत अटकळ बांधली जात होती. कारण, नितीशकुमार यांच्या नावावर एकमत होणे अवघड असल्याचे खुद्द लालू यादव यांच्या वक्तव्यातून मिळाले होते.
त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून नितीशकुमार यांनी स्वत: आपलं नाव मागे घेत काँग्रेसला आघाडीवर ठेवलं आहे. नितीशकुमार म्हणाले की त्यांना फक्त विरोधकांच्या एकतेसाठी काम करायचे आहे. संयोजक होण्यात त्यांना कोणताही रस नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		