 
						India Steel Share Price | इंडिया स्टील वर्क्स या लोह पोलाद उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. Penny Stocks
2023 या वर्षात मार्च महिन्यात इंडिया स्टील वर्क्स शेअरने 1.35 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 3.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 दिवसात इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर या कंपनीचे शेअर्स घसरणीला सुरुवात झाली आणि शेअर्सची किंमत 3 रुपये किमतीवर आली आहे.
मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 375 टक्के वाढवले आहेत. मागील एका वर्षात इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 64 टक्के वाढले होते. तर मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 94 टक्के वाढले आहेत. तर मागील एक महिन्यात इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 62 टक्के वाढले आहेत.
सेबीला मिळालेल्या माहितीनुसार इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात काही बदल करण्यात आला आहे. कंपनीने सेबीला कळवले आहे की, रत्ना दीप रंजन यांना कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह आणि इंडिपेंडंट डायरेक्टरच्या श्रेणीमध्ये अतिरिक्त डायरेक्ट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती 11 डिसेंबर 2026 पासून ते पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी असेल.
कंपनीच्या लेटेस्ट शेअर होल्डिंग डेटानुसार इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 49.89 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		