14 December 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Stock To Buy | कमी कालावधीत कमाईसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे तीन शेअर्स, फायद्याची लिस्ट सेव्ह करा

Stock To Buy

Stock To Buy | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत तुम्हाला भरघोस नफा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण या तीन शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करताना किमतीही अडचण किंग शंका येणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल तपशील

रेलटेल कॉर्पोरेशन :

शेअर बाजारातील तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणूकीसाठी RailTel Corporation Limited स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. निवडले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पत्की 172 रुपये आहे. तर नीचांकी किंमत पातळी 92 रुपये होती. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील 1-3 महिन्यांमध्ये हा स्टॉक 210 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या डिजिटायझेशनचा फायदा मोठ्या प्रमाणात या कंपनीला होणार आहे.

कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4500 कोटी रुपये असून ही एक मिनीरत्न सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीचा IPO फेब्रुवारी 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत बँड 93-94 रुपये होती. कंपनीचे शेअर्स 26 फेब्रुवारी 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. 3 मार्च 2021 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 189.45 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचली होती. तर 31 मार्च 2022 रोजी हा स्टॉक 84 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के वाढीसह 165.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Hindware Home Innovation :

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना Hindware Home Innovation स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते पुढील 9-12 महिन्यांमध्ये हा स्टॉक 750 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो. यासह तज्ञांनी स्टॉकवर 570 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पत्की किंमत 629 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 301 रुपये होती. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के वाढीसह 636.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

युनिपार्ट्स इंडिया :

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना Uniparts India Limited स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. IPO ची इश्यू किंमत 577 रुपये होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 673 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 501 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या स्टॉकची किंमत 24 टक्के मजबूत झाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील 3-6 महिन्यांसाठी या स्टॉकवर 800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.05 टक्के वाढीसह 681.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy for investment on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x