
Indian Hotel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.1 टक्के घसरणीसह 577 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी इंडियन हॉटेल स्टॉक 1.84 टक्के घसरणीसह 566.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन हॉटेल कंपनी अंश )
नुकताच इंडियन हॉटेल कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीने आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात 29.4 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 438.84 कोटी रुपयेवरून वाढून 1,951.46 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
पुढील काळात इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीने चालू आर्थिक वर्षात 25 नवीन हॉटेल्सचे उद्घाटन करण्याची योजना आखली आहे. मॉर्गन स्टॅन्लेने इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सची अल्पकालीन टार्गेट प्राइस 529 रुपये पर्यंत कमी केली आहे.
इन्वेस्टेक फर्मच्या तज्ञांच्या मते, इंडियन हॉटेल्स कंपनीच्या कामगिरीत भविष्यात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सवर 626 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.