 
						Indian Hotels Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील सलग सहा ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीसह लाल निशाणीवर क्लोज होत आहे. शेअर बाजाराच्या घसरणीमागील मुख्य कारणे म्हणजे, इस्रायल-हमास युद्ध आणि अमेरिकन बाँड यिल्डमधील वाढती ताकद यामुळे भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अशा मंदीच्या काळात ब्रोकरेज फर्मने टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 0.080 टक्के घसरणीसह 374.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 5 दिवसात इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के कमजोर झाले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी, इंडियन हॉटेल कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या व्यवहारादरम्यान शेअर 372 रुपये या नीचांक आणि 386 रुपये या उच्चांक किमती दरम्यान ट्रेड करत होता. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स सतत घसरणीसह लाल निशाणीवर क्लोज होत आहे.
ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलने इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरवर पुढील 3-5 महिन्यांसाठी 373 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 3-5 महिन्यांसाठी 450 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 437 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 280 रुपये होती.
मागील एका आठवड्यात इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 9.5 टक्के घसरले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 7.57 टक्के कमजोर झाली आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 4 टक्के घसरली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		