
Inflame Appliances Share Price Today | दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर मोठी बाजी लावली आहे. आशिष कचोलिया यांनी जानेवारी-मार्च 2023 या तिमाही कालावधीत ‘इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचे 4.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Inflame Appliances Limited)
मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के परतावा कमावून दिला आहे. आशिष कचोलिया मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 480.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
दिग्गजांची गुंतवणूक :
आशिष कचोलिया यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स खरेदी केले. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांनी इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीचे 4.2 टक्के भाग भांडवल म्हणजेच 3,08,000 इक्विटी शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. 17 एप्रिल 2023 रोजी या गुंतवणुकीचे मुख्य 14.2 कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी मुख्यतः घरगुती वस्तूंचे उत्पादन करते. कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 343.56 कोटी रुपये आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 559 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.50 लाख रुपये झाले असते. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33.82 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 16 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 480.40 रुपये किमतीवर पोहचला आहे.
आशिष कचोलियो पोर्टफोलिओ :
आशिष कचोलिया यांनी विविध क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 43 कंपन्याचे शेअर्स आहेत. हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, इन्फ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित अनेक स्टॉक त्यांनी खरेदी केले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक आशिष कचोलियो यांच्या पोर्टफोलिओ मधील स्टॉक बिनधास्त खरेदी करतात. 17 एप्रिल 2023 रोजी आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 1,791.9 कोटी होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.