28 May 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Mishthann Vs Sarveshwar Foods Share | मिष्ठान्न फूड्स की सर्वेश्वर फूड्स शेअर? कोण अप्पर सर्किट तोडतोय? शेअरची किंमतही चिल्लर

Mishthann Vs Sarveshwar Foods Share

Mishthann Vs Sarveshwar Foods Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स स्प्लिट करण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीचे शेअर्स प्री स्प्लिट किमतीच्या तुलनेत दहा पट अधिक स्वस्त झाले आहेत. दरम्यान या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. स्टॉक स्प्लिट नंतर या कंपनीचे शेअर्स 5 पेक्षा कमी किमतीवर आले होते. मात्र अजून देखील या स्टॉक मध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. (Penny Stocks)

15 सप्टेंबर 2023 रोजी एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट ट्रेडिंगनंतर सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा खालच्या किमतीवर आले होते. त्यानंतर देखील हा स्टॉक जोरदार तेजीत ट्रेड करतोय. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 5.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक्स बोनस डेटवर ट्रेड करत होते. आणि रेकॉर्ड तारखेला कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 2 : 1 प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह त्याच तारखेला कंपनीचे शेअर्स एक्स स्प्लिट म्हणून देखील ट्रेड करत होते. यात कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ दिला होता. या नंतर सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने सेबीला बोनस शेअर्स वाटपाची माहिती दिली होती. बोनस शेअर रेकॉर्ड तारखेला म्हणजेच 15 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत दिले होते. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहेत.

या कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 489 कोटी रुपये आहे. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी, आणि चालू आठवड्यात सोमवार आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mishthann Vs Sarveshwar Foods Share today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

Mishthann Vs Sarveshwar Foods Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x