15 May 2024 7:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?

Kajaria Ceramics Share price

Kajaria Ceramics Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 1375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21089 कोटी रुपये आहे. कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1523 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1006 रुपये होती. (Multibagger Stocks)

मागील 6 महिन्यांत कजारिया सिरॅमिक्स स्टॉकची किंमत 31 टक्के वाढली आहे. याकाळात शेअरची किंमत 1024 रुपयेवरून वाढून 1375 रुपये किमतीवर पोहचली आहे. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 1,358.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

18 नोव्हेंबर 2022 रोजी कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 1020 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक आता 30 टक्के अधिक वाढला आहे. मागील 5 वर्षांत, कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 246 टक्के वाढवले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीपासून हा स्टॉक 40337 टक्के वाढीसह सध्याच्या किमतीवर पोहचला आहे.

कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, 19 सप्टेंबर 2023 रोजी कजारिया इंटरनॅशनल डीएमसीसी आणि यूके पार्ट्स लिमिटेड यांच्यात एक व्यापारी करार संपन्न झाला आहे. या संयुक्त व्यापारी करारांतर्गत कजारिया सिरॅमिक्स कंपनी ब्रिटनमध्ये ग्लेझ्ड विट्रिफाइड टाइल्स, पॉलिश्ड विट्रिफाइड टाइल्स आणि इतर उत्पादने विकणार आहे. यासाठी एक नवीन कंपनीची स्थापन केली जाणार असून तिचे नामकरण कजारिया यूकेपी लिमिटेड असे केले जाणार आहे.

कजारिया सिरॅमिक्स आणि यूके पार्ट्स या दोन्ही कंपनीचा नवीन संयुक्त उपक्रमात 50-50 टक्के वाटा असणार आहे. कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड ही सिरेमिक आणि विट्रिफाइड टाइल्स बनवण्याचा व्यवसाय करणारी भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपनी आहे. कजारिया सिरॅमिक्स ही कंपनी भारतातील सिरेमिक आणि विट्रिफाइड टाइल्स बनवणारी सर्वात मोठी कंपनी आणि जगातील आठवी सर्वात मोठी कंपनी मानली जाते.

कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21000 कोटीपेक्षा अधिक स्त आहे. मागील 3 वर्षांत कजारिया सिरॅमिक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 39 टक्के नफा कमावून दिला आहे. यासह नुकताच कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर करून आपल्या गुंतवणूकदारांना 46.6 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kajaria Ceramics Share price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

Kajaria Ceramics Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x