
Infosys Share Price | मंगळवारी इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मजबूत तेजी होती. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.06 टक्के (NSE: INFY) वाढून 1,960 रुपयांवर पोहोचला होता. तसेच इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअर इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढला आणि उच्चांकी पातळी गाठली होती. (इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश)
तिमाही निकाला पूर्वी शेअर्समध्ये तेजी
इन्फोसिस लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल १७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्या तिमाही निकाला आधीच शेअर्सवर सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 1,991.45 रुपये हाती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 1,351.65 रुपये हाती. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.10 टक्के घसरून 1,918.10 रुपयांवर पोहोचला होता.
सीएनबीसी रिपोर्ट – इन्फोसिस कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
सीएनबीसी रिपोर्टनुसार, इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या महसुलात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 3.6% वाढ होईल, तर रुपयाच्या बाबतीत ती 4% वाढू शकते. या कालावधीत EBIT ८२८८ कोटी रुपयांवरून ८,७२३ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. तर मार्जिन केवळ ०.२०% वाढू शकते. तसे झाल्यास सलग दुसरी तिमाही असेल जेव्हा इन्फोसिस लिमिटेड कंपनीची महसुली वाढ मजबूत होईल. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या पहिल्या तिमाहीत महसुलात ३.६% वाढ झाली.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने काय म्हटले
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मला इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा आर्थिक वर्ष २०२५ मधील महसुली वाढीचा अंदाज ३ ते ४ टक्क्यांवरून ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे.
तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग
इन्फोसिस लिमिटेड कंपनी बद्दल स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरबाबत एकूण ४५ तज्ज्ञांनी रेटिंग जाहीर केली आहे. ४५ तज्ज्ञांपैकी ३० तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तर ४५ तज्ज्ञांपैकी १० तज्ज्ञांनी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तसेच ४५ तज्ज्ञांपैकी ५ तज्ज्ञांनी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये यंदा ३०% वाढ झाली आहे. मागील १० वर्षांचा विचार केल्यास या शेअरने केवळ दोन वेळा नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारवर या शेअरने 26.34% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.