12 December 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

शून्य रुग्ण संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य

Lockdown, Corona Crisis, Covid 19, RBI Former Governor, Raghuram Rajan

मुंबई, ३० एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा येत्या ३ मे रोजी पूर्ण होणार आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंदेही बंद आहेत. त्याचाच परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन सह अन्य समस्यांवर भाष्य केलं. “शून्य संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य आहे,” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसच त्यांनी सद्यस्थितीत गरीबांची मदत करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत यासाठी सरकारनं ६५ हजार कोटींचा निधी देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं.

सरकारला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी व्यापक विचार करावा लागेल. लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्याला चालना देण्यासाठी सरकारने प्राधान्यक्रम ठरवून उपाययोजना कराव्यात, असे राजन यांनी सुचवले. आणखी एक लाॅकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल, असे इशारा त्यांनी दिला.

संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. संपूर्ण जगासाठी ही मोठी आपत्ती आहे. मात्र संकटातही संधी असू शकते. कोरोनानंतर काही देशांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. उद्योग, पुरवठा साखळीत भारताला बराच वाव आहे. मात्र त्याआधी लॉकडाऊन संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. लॉकडाऊन संपवायचा असल्यास आपल्याला दररोज २० लाख चाचण्या घ्याव्या लागतील. अमेरिकेपेक्षा चौपट चाचण्या करण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधलं.

बाजारपेठ पुन्हा खुली केल्याने करोनाबाधीतांची संख्या शुन्य होईल, हे समजणं चुकीचे आहे, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्वाचे राहील, असे राजन यांनी सांगितले. नजिकच्या काळात चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. कोरोनाच्या संकटकाळात जागतिक बाजारपेठेला पुरवठा करणारे केंद्र बनण्याची संधी भारताला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

News English Summary: A lockdown has been declared in the country against the backdrop of the corona virus. The second phase of the lockdown will be completed on May 3. Businesses in the country are also closed due to the lockdown. The same has happened to the country’s economy. Meanwhile, former Congress president Rahul Gandhi called on former Reserve Bank governor Dr. Interacted with Raghuram Rajan. This time he commented on other issues, including the lockdown. “It’s impossible if you think the lockdown will open at zero,” he said.

News English Title: Story corona virus Former RBI Governor Raghuram Rajan speaks about challenges front Indian economy Lockdown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x