12 December 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

अर्थव्यवस्थेचा सुद्धा विचार करा, दीर्घकाळ लॉकडाऊन परवडणारं नाही - रघुराम राजन

Covid 19, Corona Crisis, Raghuram Rajan, Economy

नवी दिल्ली, २५ एप्रिल: कोरोना व्हायरसचा झटका अशा वेळी बसला आहे. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था आधीच घसरणीला लागली होती. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि धोका वाढल्याने देशांतर्गत गुंतवणुकीत सुधारणा करावी लागले. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार पुढील आर्थिक वर्ष म्हणजे २०२१-२२ मध्ये करोनाचा प्रभाव संपेल आणि त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ५ टक्के विकास दर गाठू शकेल असं म्हटले होते. त्यानंतर उलटे संकेत देखील होते. तर २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल असं देखील म्हटलं होतं.

भारतातील लॉकडाऊन आणखी वाढला तर ते अर्थव्यवस्थेसाठी निश्चित चांगले असणार नाही. या लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम अधिक भयानक असतील. या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताला सर्वात प्रथम करोनाचा प्रसार होण्यापासून रोखले पाहिजे. त्याच बरोबर सर्वांना अन्न-धान्य मिळेल याची सोय करावी, असे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ हॅस टीमर यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

दरम्यान, आता रघुराम राजन यांनी देखील केंद्राला आर्थिक स्थितीवरून सतर्कतेचा इशारा दिला आहे. करोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आता सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डाॅ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. दीर्घकाळ लाॅकडाऊन भारताला परवडणारे नाही. सरकारने आता जीवनावश्यक गरजा भागवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने २१ दिवसांचा लाॅकडाऊन दुसऱ्यांदा वाढवला आहे. ३ मे रोजी लाॅकडाऊनची मुदत संपुष्टात येणार आहे. करोनाचा वाढता प्रसार देशासाठी धोकादायक आहे. करोना रोखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. मात्र त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसला आहे. कोट्यवधी लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे राजन यांनी सांगितले. आता परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकारसमोर मोठं आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले.

आता सरकारने अर्थचक्राला गती देण्याचे काम तातडीने केले पाहिजे. अर्थव्यवस्थेची खालावलेली तब्येत सुधारण्यासाठी पावले उचलावीत. आर्थिक मदतीचे पॅकेज देताना सरकारने जागरुक राहिलं पाहिजे, असेही राजन यांनी स्पष्ट केले. पॅकेजमुळे चलनाला झळ पोहचता कामा नये तसेच व्याजदर देखील वाढता कामा नये, असे राजन यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: Raghuram Rajan has also warned the Center to be vigilant over the financial situation. The government should now take immediate steps to reduce the economic losses caused by the corona, said former RBI Governor Dr. Raghuram Rajan. Prolonged lockdown is not affordable for India. The government should now give priority to meeting the necessities of life, he said.

News English Title: Story Former RBI Governor Raghuram Rajan expect union Government should focus of economy restoration covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x