
Infosys Share Price | गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बीएसई सेन्सेक्स ४६६ अंकांनी घसरून ७९४७७ च्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये सुद्धा १०० अंकांनी घसरण झाली होती. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
इन्फोसिस कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी इन्फोसिस कंपनी शेअर 1.08 टक्क्यांनी वाढून 1,936.75 रुपयांवर पोहोचला होता. इन्फोसिस कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2,006.45 रुपये होती, तर इन्फोसिस कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,358.35 रुपये होती. इन्फोसिस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 8,04,315 कोटी रुपये आहे.
इन्फोसिस कंपनी शेअर टार्गेट प्राईस
ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देण्यासह 2165 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस आणि त्यानंतर 2335 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते इन्फोसिस कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 30 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो.
इन्फोसिस कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात इन्फोसिस कंपनी शेअरने 1.37% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात इन्फोसिस कंपनी शेअर 3.93% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.34% घसरला आहे. मागील १ वर्षात इन्फोसिस कंपनी शेअर 12.58% घसरला आहे. मागील ५ वर्षात इन्फोसिस कंपनी शेअर 57.49% घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 61.84% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इन्फोसिस कंपनी शेअरने 1.93% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.