
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्चांकावर असताना देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा काळात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात शेअर बाजार अस्थिर असताना रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या शेअरमध्ये मोठी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 इंडेक्स आपल्या नीचांक पातळीपासून 125 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर बँक निफ्टी देखील 250 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली आहे. तर एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये देखील सर्वाधिक खरेदी पाहायला मिळाली आहे. निफ्टी इंडेक्सचा एफएमसीजी निर्देशांक दीड टक्क्याच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर नेस्ले कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूकदारांनी इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र आता विक्रीचा दबाव वाढल्याने अनेक गुंतवणुकदार इन्फोसिस स्टॉक विकून बाहेर पडत आहेत. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,562.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 2-3 टक्केच वाढली आहे.
ज्युबिलंट फूड, कोलगेट आणि मॅरिको या कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील आयटी आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली होती.
शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांनी CIPLA कंपनीचे शेअर्स देखील खरेदी केले होते. मात्र आता गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना सिप्ला कंपनीचे शेअर्स विकून बाहेर पडत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञ सिप्ला कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत. कारण तज्ञांना असे वाटते की, हा स्टॉक पुढील काही दिवसात 5-6 टक्के अधिक वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सिप्ला स्टॉक 0.49 टक्के वाढीसह 1,243.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.