
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 1,536.60 रुपये किमतीवर पोहचले होते. इन्फोसिस स्टॉक YTD आधारे बीएसई सेन्सेक्स इंडेक्सच्या 6 टक्के वाढीच्या तुलनेत 1 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मात्र आता हा स्टॉक आता मजबूत वाढीचे संकेत देत आहे.
टेक्निकल चार्टवर इन्फोसिस स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 3.99 टक्के वाढीसह 1,531 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इन्फोसिस स्टॉक आपल्या 100 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 14 दिवसाचा RSI 66.89 अंकावर आला आहे. तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकने 1,500-1,475 रुपये रेंजमध्ये सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला अधिक वाढीसाठी 1,570 रुपये ही प्रतिकार किंमत पार करावी लागेल.
प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 1,585 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एंजल वन फर्मच्या मते, इन्फोसिस स्टॉकमध्ये सकारात्मक सेटअप पाहायला मिळत आहे. जो हाय झोनमध्ये जाण्याचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकला 1,550-1,570 रुपये रेंजमध्ये प्रतिकार मिळत आहे.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकने 1,500 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर 1,550 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,550 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 1,600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या शेअरची पुढील एका महिन्याची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,475 रुपये ते 1,600 रुपये दरम्यान असेल.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 1,580 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1,490 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. इन्फोसिस कंपनीचा प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 22.44 अंकावर आहे. आणि P/B मूल्य 7.53 अंकावर आहे. या कंपनीच्या शेअर्सची प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS 33.55 अंकावर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.