
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकानी आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती. त्यांनतर हे दोन्ही इंडेक्स किंचित खाली आले होते. गुरूवारी BSE सेन्सेक्स इंडेक्स 0.53 टक्क्यांच्या घसरणीसह 79,924.77 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 0.45 टक्क्यांच्या घसरणीसह 24,324.45 अंकावर क्लोज झाला होता.
अशा काळात येस बँक सिक्युरिटीजने गुंतवणूक करण्यासाठी टॉप तीन आयटी शेअर्स निवडले आहेत. यामधे Tata Consultancy Services Ltd, Infosys आणि HCL Technologies हे स्टॉक सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
इन्फोसिस :
येस बँक सिक्युरिटीजच्या तज्ञांनी या आयटी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1,780 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1570 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के वाढीसह 1,700.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस :
तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्सला 4,100 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकने 3,790 रुपये किमतींजवळ मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या वर टिकला तर शेअर अल्पावधीत 4,100-4,150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला तर शेअर संभाव्यतः 3790 रुपये या आपल्या 200-दिवसांच्या SMA च्या खाली जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 4,083.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एचसीएल टेक्नॉलॉजीज :
येस बँक सिक्युरिटीजच्या तज्ञांनी या आयटी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1,620 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1435 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 1,490-1,500 रुपये दरम्यान खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के वाढीसह 1,556.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.