14 December 2024 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Manoj Vaibhav Jewellers Share Price | सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा फायद्याचा या ज्वेलर्स कंपनीचा शेअर, 2 महिन्यात 115% परतावा दिला

Manoj Vaibhav Jewellers Share Price

Manoj Vaibhav Jewellers Share Price | मागील एका महिन्यात मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 54 टक्के वाढली आहे. 4 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक आता 115 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1620 कोटी रुपये आहे.

14 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालकांनी तिमाही निकालांना मंजुरी दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के वाढीसह 333.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 619.20 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील तिमाहीत या कंपनीने 508.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीने 555.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 29.7 कोटी रुपये PBT नोंदवला होता, जो मागील तिमाहीत 25.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत या कंपनीने 27.2 कोटी रुपये PBT नोंदवला होता.

मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 22.1 कोटी रुपये PAT नोंदवला होता. मागील तिमाहीत या कंपनीचा PAT 19.2 कोटी रुपये होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 20.4 कोटी रुपये PAT नोंदवला होता. वैभव ज्वेलर्स कंपनी 2008 पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात दागिन्यांच्या किरकोळ विक्रीचा व्यवसाय करत आहे. या कंपनीने प्रीमियम दागिन्यांसाठी खास ब्रँड देखील लॉन्च केला आहे.

मागील आर्थिक वर्षात या कंपनीने आपल्या व्यवसायातून 2027 कोटी रुपये कमाई केली होती. तर वर्षानुवर्ष या कंपनीने आपल्या व्यवसायात 19 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मनोज वैभव जेम्स कंपनीने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात दागिने बाजारपेठेत 4 टक्के वाटा काबीज केला आहे. तर संघटित दागिन्यांच्या बाजारपेठेत कंपनीने 10 टक्के वाटा काबीज केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Manoj Vaibhav Jewellers Share Price NSE 17 November 2023.

हॅशटॅग्स

Manoj Vaibhav Jewellers Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x