
Infosys Share Price | इन्फोसिस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह 1411.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
इन्फोसिस कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत 37,923 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार या कंपनीने 38413 कोटी रुपये महसूल संकलित करणे अपेक्षित होते. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 1,422 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इन्फोसिस कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 7,969 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 30.5 टक्के वाढ झाली आहे.. आर्थिक वर्ष 2024 मध्ये इन्फोसिस कंपनीच्या महसुल संकलनात 1.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ स्थिर चलनाच्या दृष्टीने कंपनीच्या 1.5-2.0 टक्के मार्जिनपेक्षा कमी आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात चांगली कामगिरी करू शकतो.
जागतिक ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक TCS च्या तुलनेत कमी वाढेल. मात्र नुवामा फर्मने इन्फोसिस स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 1720 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सिटी फर्मच्या मते, इन्फोसिस स्टॉक 1350 रुपये किमतीवर खरेदी करण्यास आकर्षक वाटत आहेत. हा स्टॉक अल्पावधीत 1550 रुपये टार्गेट प्राइस स्पर्श करू शकतो.
नोमुरा फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक 1400 रुपये किमतीवर खरेदी करावा. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या मते, इन्फोसिस स्टॉक 1375 रुपये किमतीपर्यंत खाली येऊ शकतो. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी इन्फोसिस स्टॉक 1650 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.