
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्काच दिला होता. या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 175 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,490 कोटी रुपये आहे. आगामी अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत घोषणा होण्याच्या अपेक्षेने हा स्टॉक तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 8.48 टक्के वाढीसह 171.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
नुकताच या कंपनीला अनेक नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. ही बाब देखील कंपनीच्या शेअर्ससाठी सकारात्मक ट्रिगर ठरली आहे. आयनॉक्स विंड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना अक्षय ऊर्जा उत्पादक कंपनीकडून 200 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणीची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कंपनीच्या नवीनतम 3MW क्षमतेच्या विंड टर्बाइन जनरेटरसाठी आहे. मागील एका वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 254 टक्के नफा कमवून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 15 टक्क्यांनी वाढवले आहेत. मागील 6 महिन्यांत आयनॉक्स विंड स्टॉक तब्बल 55 टक्के मजबूत झाला आहे. 2024 या वर्षात आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 31 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील 4 वर्षांत आयनॉक्स विंड स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 1700 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.