11 December 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

TCS Share Price | तज्ज्ञांकडून TCS शेअरसाठी BUY रेटिंग, मालामाल करणार शेअर, पुढची टार्गेट प्राइस नोट करा

TCS Share Price

TCS Share Price | भारतीय आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी केली होती. शुक्रवारी टीसीएस कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 4169.55 रुपये या आपल्या दिवसभरातील उच्चांक किमतीवर पोहचले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला होता. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )

जून 2024 तिमाहीत टीसीएस कंपनीने वार्षिक आधारावर निव्वळ नफ्यात 9 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 12040 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून 2024 तिमाहीत टीसीएस कंपनीने वार्षिक आधारावर महसूल संकलनात 5.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने तब्बल 62613 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून तिमाहीच्या जबरदस्त अहवालानंतर अनेक ब्रोकरेज फर्मने टीसीएस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी टीसीएस स्टॉक 6.59 टक्के वाढीसह 4,182.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जेफरीज :
अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजने टीसीएस स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4615 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

CLSA :
या ब्रोकरेज फर्मने देखील टीसीएस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4007 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, जून 2024 तिमाहीत या कंपनीचे EBITDA मार्जिन अंदाजापेक्षा चांगले राहिले आहे.

जेपी मॉर्गन :
जेपी मॉर्गनने टीसीएस स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जेपी मॉर्गन फर्मच्या मते, टीसीएस कंपनीने जून तिमाहीत उत्पन्न आणि मार्जिनच्या बाबतीत उत्तम कामगिरी केली आहे.

नुवामा :
या ब्रोकरेज फर्मने टीसीएस स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4800 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या ब्रोकरेज फर्मने टीसीएस कंपनीच्या जून तिमाहीच्या निकालांना टर्नअराउंड वर्षाची ठोस सुरुवात असे वर्णन केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x