20 May 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Salasar Techno Share Price | 3 रुपयांच्या पेनी शेअरने 3 वर्षात दिला 1600 टक्के परतावा, शेअर आजही स्वस्त, ऑर्डरबुक मजबूत

Salasar Techno Share Price

Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्क्यांच्या वाढीसह 51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे.

सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1610 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 58.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 35.60 रुपये होती.

मागील एका महिन्यात सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सालासर टेक्नो स्टॉक 25 टक्के मजबूत झाला आहे. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

27 मार्च 2023 रोजी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअर 45 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 3.89 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 1600 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे.

सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून 364 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड ही एक मोठी आणि जड स्टील स्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून कस्टमाइज्ड स्टील स्ट्रक्चर्स आणि EPC सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीच्या ग्राहकांमध्ये टेलिकॉम, पॉवर, रेल्वे क्षेत्रातील दिग्गज कंपन्या सामील आहेत.

तामिळनाडू राज्याच्या इरोड जिल्ह्यात वीज पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीला फीडर सेग्रीगेशन, हाय व्होल्टेज वितरण प्रणाली, दुहेरी वितरण ट्रान्सफॉर्मर वेगळे करणे आणि 33 किलोवॅट लाइन वाढवणे यासारख कामे पार पाडावी लागणार आहे.

हे काम पूर्ण करण्यासाठी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीला 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ही कंपनी दूरसंचार, उर्जा, अक्षय ऊर्जा, स्मार्ट सिटी सोल्यूशन आणि हेवी स्टील स्ट्रक्चर्स या पायाभूत सुविधा व्यवसायात एक अग्रणी कंपनी मानली मते. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनी स्वतःला डिपेंडेबल इन्फ्रास्ट्रक्चर एनेबर्स म्हणते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Salasar Techno Share Price NSE 05 December 2023.

हॅशटॅग्स

Salasar Techno Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x