20 May 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Greenchef Appliances IPO | ग्रीनशेफ अप्लायन्सेस IPO गुंतवणुकीसाठी खुला होतोय, बक्कळ कमाईची सुवर्ण संधी, प्राईस बँड 82-87 रुपये

Greenchef Appliances IPO

Greenchef Appliances IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. किचन उपकरणे बनवणाऱ्या ग्रीनशेफ अप्लायन्सेस कंपनीचा IPO 23 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये शेअरची किंमत बँड 82-87 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

GreenChef अप्लायन्सेस कंपनीचा IPO 23 जून 2023 ते 27 जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. अँकर गुंतवणूकदार 22 जून 2023 रोजी IPO शेअर्सवर पैसे लावू शकतात. कंपनीने जाहीर केलेल्या एका निवेदनात माहिती दिली आहे की, त्यांचे शेअर्स NSE Emerge इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. NSE Emerge इंडेक्स राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE मधील लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी स्थापित केलेले व्यासपीठ आहे.

ग्रीनशेफ अप्लायन्सेस कंपनीच्या IPO मध्ये 61.63 लाखांहून अधिक फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. निश्चित केलेल्या उच्च किंमत मर्यादेवर कंपनी 53.62 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची शक्यता आहे. I

PO इश्यूच्या माध्यमातून उभारलेला भांडवल कंपनी नवीन प्लांट उभारण्यासाठी आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी, तसेच खेळत्या भांडवलाची गरज व सामान्य कामकाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Greenchef Appliances IPO GMP check details on 21 June 2023.

हॅशटॅग्स

Greenchef Appliances IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x