Integra Essentia Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 6 रुपये, वेळीच एंट्री घ्या, फुकट मिळतील शेअर्स, ऑर्डरबुक मजबूत

Integra Essentia Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. नुकताच इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीला सर्वेश्वर फूड्स लिमिटेड आणि सवेश्वर ओव्हरसीज लिमिटेड व हिमालयन बायो ऑरगॅनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपन्याकडून प्रीमियम तांदूळचा पुरवठा करण्याची 18 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.

इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीला या ऑर्डरची पूर्तता 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करायची आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के वाढीसह 6.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

यापूर्वी इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीला सर्वेश्वर फूड्स लिमिटेड आणि तिची उपकंपनी हिमालयन बायो ऑर्गन फूड्स लिमिटेड कंपनीन 15 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. नुकताच इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीने प्रीमियम ड्राय फ्रूट्स आणि ERW स्टील पाईप्स, HR कॉइल्स सारख्या पायाभूत सामग्रीचा पुरवठा करण्याची 12,10,00,00 रुपये मूल्याची ऑर्डर मिळवली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे 1.06 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी रेकॉर्ड तारखेच्या दिवशी आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनी रेकॉर्ड तारीख जाहीर करेल. इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनी 100 कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी सिक्युरिटीज जारी करणार आहे. यामध्ये QIP ADR , GDR , FCCB किंवा इतर कोणतीही पद्धत वापरली जाऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price BSE 11 December 2023.