
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 33 पैशांवरून वाढून 7 रुपयेच्या पार गेली आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे.
इंटेग्रा एसेंशिया कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 1.37 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार संचालक मंडळाचा बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. याशिवाय संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी भांडवल उभारणीचा प्रस्ताव मंजूर करू शकते. इंटेग्रा एसेंशिया कंपनी सिक्युरिटीज, परिवर्तनीय साधने किंवा इतर माध्यमातून भांडवल उभारणी करु इच्छित आहे.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2203 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 33 पैशांवर ट्रेड करत होते. 20 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.03 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.10 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.