
Integra Essentia Share Price | इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. , नुकताच या कंपनीला ITC कंपनीकडून 500 मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 14.25 दशलक्ष रुपये आहे. ( इंटेग्रा इसेंन्शिया कंपनी अंश )
नवीन ऑर्डर मिळाल्याची बातमी येताच इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2 टक्के वाढले होते. शुक्रवारी 24 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के वाढीसह 3.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी इंटेग्रा इसेंन्शिया स्टॉक 1.35 टक्के वाढीसह 3.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीने मंगळवार दिनांक 28 मे रोजी राईट्स इश्यूवर चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर रिटर्न देण्यासाठी ओळखले जातात. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 83 पैसेवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.83 रुपये होती. तर नीचांकी पातळी 2.55 रुपये होती.
इंटेग्रा इसेंन्शिया या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 340.03 कोटी रुपये आहे. इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राइट्स इश्यूचा आकार, रेकॉर्ड डेट आणि त्याची किंमत यावर चर्चा केली जाणार आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत इंटेग्रा इसेंन्शिया कंपनीची निव्वळ विक्री 50.4 टक्के वाढीसह 93.31 कोटी रुपये नोंदवली गेली होती. याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 734.8 टक्के वाढीसह 5.92 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.