12 December 2024 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Tata Group Share | टाटा समूहातील हा शेअर स्वस्तात मिळतोय, पुढे शेअर प्रचंड नफा देऊ शकतो, स्टॉक डिटेल वाचा

Tata Group Share

Tata Group Share | हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उद्योग करणारी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, जंगल सफारी, पॅलेस, स्पा आणि इन-फ्लाइट केटरिंग सेवा प्रदान करते. IHCL ही कंपनी टाटा उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुनीत छटवाल विराजमान आहेत. टाटा सन्स कडे या कंपनीचे बहुसंख्य भाग भांडवल आहेत. या कंपनीच्या प्रमुख हॉटेलमध्ये मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलचा देखील समावेश होतो. 1899 मध्ये जमशेदजी टाटा यांनी IHCL कंपनीची स्थापना केली होती, आणि तिचे मुख्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले होते. या कंपनीकडे जगात 4 खंडांमध्ये 107 ठिकाणी 250 हून अधिक हॉटेल्स आहेत, आणि 10 देशांमध्ये 21,000 हून अधिक हॉटेल रूम्स आहेत. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील काही काळात कमालीची कामगिरी केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)

गुंतवणुकीवर परतावा :
आज या कंपनीचे शेअर्स 298.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल दुपारी 1 च्या सुमारास या कंपनीचा शेअर 313 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. परंतु तज्ञांच्या मते स्टॉक मध्ये थोडी तेजी आली की हा स्टॉक पुढील काळात 390 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तज्ञांनी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या स्टॉकसाठी 390 रुपये ही लक्ष्य किंमत सुचवली आहे. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या 298 रुपये किमतीवर खरेदी केला आणि स्टॉक 390 वर गेला तर तुम्हाला प्रती शेअर 90 रुपये नफा सहज मिळू शकतो. हा स्टॉक मागील काही आठवड्यापासून तेजीत ट्रेड करत होता, मात्र काही दिवसापासून त्यात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

मागील काही काळातील परतावा :
मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 5.88 टक्क्यांनी खाली आली आहे. अवघ्या एका महिन्यात हा स्टॉक 1.17 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या स्टॉकने लोकांना 69.79 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 73 टक्के परतवा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या स्टॉकमध्ये 170.29 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. जुलै 1995 मध्ये हा शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता. तेव्हा पासून आतापर्यंत स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 627.40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरबद्दल इतर डिटेल :
इंडियन हॉटेल्स कंपनीचे बाजार भांडवल 44,281 कोटी रुपये आहे. या स्टॉक ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 348.70 होती. तर स्टॉकची नीचांक किंमत पातळी 172.35 रुपये आहे. 348.70 रुपये ही या स्टॉकची सर्वोच्च किंमत होती. आज या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी शेअर 309 रुपये किमतीवर ओपन झाला होता, मात्र नंतर त्यात विक्रीचा दबाव वाढल्याने आता शेअर 298 रुपये जवळ ट्रेड करत आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :
1980 मध्ये ताज ग्रुपने येमेनमधील साना येथे आपले पहिले आंतरराष्ट्रीय हॉटेल सुरू केले होते. त्याच वर्षी झांबिया देशात लुसाका या ठिकाणी ताज पामोदझी नावाचे हॉटेल सुरू करण्यात आले. कंपनीने ताज एक्सोटिका बेंटोटा आणि ताज सी या नावाने श्रीलंका कोलंबोममध्ये हॉटेल्स सुरू केले. GV कृष्णा रेड्डी आणि ताज हॉटेल्स यांच्या संयुक्त उपक्रमाने ताज GVK ची स्थापना करण्यात आली. त्यांनी ताज बंजारा, ताज कृष्णा आणि ताज डेक्कनसह हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायाचा विस्तार केला आहे. हा कंपनीने दुबईमध्ये ताज पॅलेस सुरू केला आणि, मध्यपूर्वे देशातील बाजारपेठेतही प्रवेश केला. त्यानंतर या कंपनीने आणखी तीन मोठे हॉटेल्स सुरू केले, ते म्हणजे मुंबईतील रीजेंट हॉटेल, जैसलमेरमधील रावल-कोट आणि ग्वाल्हेरमधील उषा किरण पॅलेस. कंपनीच्या वाढता उद्योग आणि विस्तार पाहून ही कंपनी भविष्यात काहीतरी कमाल करेल यात शंका नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Company Share price Bounce back check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

Tata Group Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x