
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 1600 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 पैशांवरून वाढून 5 रुपयेपेक्षा जास्त झाली आहे. सरकारी मालकीची विमा कंपनी LIC ने देखील इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. (Integra Share Price)
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.16 रुपये होती. 27 नोव्हेंबर 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 33 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 3.54 टक्के वाढीसह 5.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एक लाखावर 17 लाख परतावा :
28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तर कोरोना काळात स्टॉक 33 पैसे किमतीवर ट्रेडकरत होता. जर तुम्ही 27 नोव्हेंबर 2020 रोजी Integra Essentia कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.72 लाख रुपये झाले असते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1.74 टक्के परतावा कमावून दिला आहे.
भाग भांडवल प्रमाण :
सरकारी मालकीच्या LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 48.59 लाख शेअर्स धारण केले आहेत. एप्रिल-जून 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार LIC कंपनीने Integra Essentia कंपनीचे 48,59,916 शेअर्स धारण केले आहेत. LIC कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 1.06 टक्के मालकी भाग भांडवल ताब्यात ठेवले आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत इंटेग्रा एसेंशिया कंपनीमध्ये LIC या सरकारी विमा कंपनीची शेअर होल्डिंग 1.06 टक्के नोंदवली गेली होती. म्हणजेच, LIC कंपनीने Integra Essentia कंपनीच्या होल्डिंगमध्ये स्थिरता राखली आहे. मागील एका वर्षात इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 13.97 टक्के कमजोर झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.