1 May 2025 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Invest Money | फक्त 500 रुपयांपर्यंत गुंतवणुक करून या 5 योजना तुम्हाला बनवतील श्रीमंत, सुरक्षित परताव्याची हमी मिळेल

Invest Money

Invest Money | भारत सरकार आपल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. गुंतवणूक योजना, बचत योजना आणि इतर ही योजना आहेत याद्वारे सरकार लोकांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही जबरदस्त गुंतवणूक योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपये गुंतवून चांगला फायदा मिळवू शकता.

सुकन्या समृद्धी योजना :
तुमच्या मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार द्वारे सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. या योजनेत तुम्हाला सध्या 7.6 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा दिला जातो. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख वार्षिक आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते :
MIS योजनेचा मुदत पूर्ती कालावधी 5 वर्षे आहे. यावरील सध्याचा व्याज दर परतावा वार्षिक 6.6 टक्के असेल, जो तुम्हाला दर महिन्याला दिला जाईल. पोस्ट ऑफिस MIS योजनेत किमान 1000 रुपये टाकून खाते उघडता येते. एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपये असेल आणि संयुक्त खात्यासाठी गुंतवणूक मर्यादा कमाल 9 लाख रुपये असेल. 10 वर्षांवरील अल्पवयीन आणि मतिमंद व्यक्तीच्या नावाने या योजनेत खाते उघडता येते. जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एमआयएस योजना खाते मुदतीपूर्वी बंद करायचे असेल तर तुम्ही 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुमचे योजना खाते बंद करू शकता.

किसान विकास पत्र :
छोट्या गुंतवणुकीत दुप्पट परतावा हवा असेल तर ही योजना एक चांगला पर्याय आहे. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आता 6.9 टक्के व्याज परतावा दिला जाईल. यामध्ये परतावा जबरदस्त असेल परंतु त्यावर तुम्हाला आयकर सूट मिळणार नाही. यासह, पूर्वी हे योजना खाते 113 महिन्यांत परिपक्व होत होते, आता हे परिपक्व होण्यास 124 महिन्यांचा कालावधी लागतो. किसान विकास पत्रात किमान तुम्हाला 1000 रुपये गुंतवणूक करता येतील. त्याच वेळी, कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

म्युच्युअल फंड :
म्युच्युअल फंडात कोणीही पैसे गुंतवणूक करू शकतो. तुम्ही 10 टक्के व्याज दराने 15 वर्षांच्या कालावधीत 500 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीवर 2 लाख रुपये नफा मिळवू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक वाढवू किंवा कमी करू शकता. याशिवाय 90,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1.10 लाख रुपये परतावा मिळेल. तुम्ही म्युचुअल फंड मध्र ऑनलाइन गुंतवणूक देखील करू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय आहे. सध्या पीपीएफमधील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ व्याज परतावा मिळत आहे. कारण ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला कर सवलत दिली जाईल. या योजनेत मिळणारा व्याज परतावा पूर्णपणे करमुक्त असेल. पीपीएफ ठेवींवरही कोणताही संपत्ती कर आकारला जाणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Invest Money in various government schemes for safe return on investment on 25 August 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या