2 May 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

Investment Tips | तुम्ही या योजनेत दररोज 100 रुपये जमा करा आणि 15 लाख रुपये मिळवू शकता

Investment Tips

Investment Tips | मुलं मोठी झाली की पालक आपल्या भविष्याचा विचार करू लागतात. अभ्यासाचा असो वा लग्न करण्याचा विषय असो, भारतीय समाजात मुलींबाबत लोक विविध प्रकारचे प्लॅनिंग करत राहतात. जर तुम्हीही तुमच्या मुलीच्या भविष्याबद्दल काही करण्याचा विचार करत असाल तर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची अल्पबचत योजना आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत सन २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते.

ही एक सरकारी योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही एक सरकारी योजना आहे, जी खास फक्त मुलींसाठीच तयार केली गेली आहे. त्यात गुंतवणुकीवरही अधिक व्याज असून करसवलत आहे. तसेच, ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे जिथे आपला पैसा सुरक्षित राहतो. या प्लानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता नाही. यासाठी तुम्ही फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकता.

गुंतवणुकीवरील व्याज ७.६ टक्के :
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचं खातं उघडता येतं. या योजनेत गुंतवणूक केल्यास ७.६ टक्के व्याजदर मिळतो. या योजनेत तुमचे पैसे 9 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतात. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीसाठी रोज 100 रुपयांची बचत केली तर तुम्हाला 15 लाख रुपये मिळतील. जर तुम्ही दररोज 416 रुपयांची बचत केली तर मॅच्युरिटीवर तुमच्याकडे 65 लाख रुपयांचा कॉर्पस असेल.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) ही केंद्र सरकारची अल्पबचत योजना आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत सन २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते. सुकन्या ही अल्पबचत योजनेतील सर्वोत्तम व्याजदर योजना आहे.

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडू शकता :
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक शाखेच्या कोणत्याही अधिकृत शाखेत उघडता येते. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्यानंतर मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा वयाच्या १८ व्या वर्षानंतर लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येते.

१५ लाखांचा निधी कसा जमा करणार :
जर तुम्ही या योजनेत दरमहा ३,००० रु. म्हणजेच वार्षिक ३६,००० रु. गुंतविले तर तुम्हाला १४ वर्षांनंतर वार्षिक ७.६ टक्के चक्रवाढ दराने ९,११,५७४ रुपये मिळतील. २१ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे १५,२२,२२१ रुपये असेल. म्हणजे रोज १०० रुपयांची बचत करून जमा केले तर मुलीसाठी १५ लाख रुपयांचा फंड तयार करता येईल. त्याचबरोबर दररोज 416 रुपयांपर्यंत बचत करून तुम्ही 65 लाख रुपये जोडू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Tips in Sukanya Samridhi Yojana check details 15 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या