 
						IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. मुथूट फायनान्स कंपनीची उपकंपनी बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनीने IPO साठी सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर कागदपत्रे दाखल केली आहेत. IPO द्वारे ही कंपनी 1300 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार करत आहे. ( बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
IPO च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार चेन्नईस्थित या बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये 1000 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू केले जातील. आणि गुंतवणूकदार 300 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जातील.
डॅनिश मालमत्ता व्यवस्थापन फर्म MAJ इन्व्हेस्ट कंपनीने आपले बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनीमधील 175 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासह अरुम होल्डिंग्स लिमिटेड कंपनी आपले 97 कोटी रुपये मूल्याचे आणि ऑगस्टा इन्व्हेस्टमेंट्स झिरो पीटीई लिमिटेड ही कंपनी आपले 28 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे.
बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO व्यवस्थापित करण्यासाठी ICICI सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, HDFC बँक आणि SBI कॅपिटल मार्केट्स यांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. IPO मधून मिळणारी रक्कम ही कंपनी आपल्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे. तर उर्वरित रक्कम कंपनी आपल्या सामान्य कॉर्पोरेट हेतूंची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे.
बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड ही कंपनी मुथूट फायनान्सची उपकंपनी आहे. ही कंपनी एक मायक्रो फायनान्स कंपनी आहे. मुथूट फायनान्स या कंपनीने प्रवर्तक म्हणून, बेलस्टार मायक्रोफायनान्स कंपनीचे 66 टक्क्यांपेक्षा जास्त भागभांडवल धारण केले आहे. या कंपनीचे कर्ज मॉडेल प्रामुख्याने स्वयं सहाय्यता गट मॉडेलवर आधारित आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीने 1,283 कोटी रुपये महसुल संकलित केला होता, त्यात कंपनीचा नफा 235 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		