2 May 2025 7:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPO GMP | बावेजा स्टुडिओ IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई हॊईल, GMP पहा

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या हरमन बावेजा यांच्या मालकीच्या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर्स बाजारात लाँच होणार आहे. या कंपनीचे नाव, बावेजा स्टुडिओ असे आहे. या कंपनीचा IPO 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, बावेजा स्टुडिओ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. बावेजा स्टुडिओ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 170-180 रुपये निश्चित केली आहे. जर या IPO स्टॉकची ग्रे मार्केट किंमत स्थिर राहिली आणि गुंतवणूकदारांना हा स्टॉक अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आला तर, कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

बावेजा स्टुडिओ कंपनीच्या IPO चा आकार 97.20 कोटी रुपये आहे. यामध्ये 72 कोटी रुपयेचे फ्रेश शेअर्स वाटप केले जातील. आणि 25.20 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1800 शेअर्स ठेवले आहेत. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,44,000 रुपये जमा करावे लागणार आहेत. या कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 5 फेब्रुवारी रोजी केले जातील. आणि मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर शेअर्स सूचीबद्ध केले जातील.

बावेजा स्टुडिओ ही कंपनी 2001 मध्ये स्थापन करण्यात आलेली 23 वर्षे जुनी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः चित्रपट निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीने चार साहिबजादे, लव्ह स्टोरी 2050, कयामत, स्पीड, में ऐसा ही हूं, यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. यासह बावेजा स्टुडिओ कंपनीने दिलजले, दिलवाले, तीसरी आँख सारखे हिंदी आणि पंजाबी चित्रपट देखील बनवले होते. यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते.

बावेजा स्टुडिओ कंपनीने भौकाल ही वेबसिरीज देखील बनवली होती. अभिनेते हरमन बावेजा हे बावेजा स्टुडिओ कंपनीचे सीईओ आहेत. या कंपनीच्या प्रवर्तक गटात हरजसपाल सिंग बावेजा, परमजीत हरजसपाल, हरमन बावेजा आणि रोवेना बावेजा हे आहेत. हरमनने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी लव्ह स्टोरी 2050, व्हॉट्स युवर राशी यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकले नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP for investment on 29 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या