
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3000 कोटी रुपये आहे. ( आधार हाउसिंग फायनान्स कंपनी अंश )
ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा IPO शानदार कामगिरी करत आहे. आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा IPO 8 मे ते 10 मे 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा IPO स्टॉक 13 मे 2023 रोजी गुंतवणुकदारांना वाटप केला जाईल. आणि 15 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. आधार हाउसिंग फायनान्स कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सची किंमत बँड 300 ते 315 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 47 शेअर्स ठेवले आहेत. यामुळे रिटेल गुंतवणूकदाराला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 14,805 रुपये जमा करावे लागतील.
आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. तज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 65 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा आयपीओ 380 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या गुंतवणुकदारांना IPO मध्ये शेअर वाटप केले जातील, त्यांना पहिल्याच दिवशी 20.63 टक्के नफा मिळू शकतो. आधार हाऊसिंग फायनान्स आपल्या IPO द्वारे 3.17 कोटी फ्रेश शेअर्स आणि 6.35 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. प्रवर्तकांनी या कंपनीचे 98.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.