IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीची उपकंपनी असलेल्या आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीच्या आयपीओला सेबीने परवानगी दिली आहे. ( मायक्रोफायनान्स कंपनी अंश )

फेब्रुवारी 2015 मध्ये मणप्पुरम फायनान्स कंपनीने चेन्नईस्थित आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीचे बहुसंख्य भागभांडवल खरेदी करून ही कंपनी ताब्यात घेतली होती. आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीच्या IPO ची बातमी येताच मणप्पुरम फायनान्स कंपनीचा शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह 200 रुपये किमतीच्या पार गेला होता. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी मणप्पुरम फायनान्स स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 201.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या वार्षिक अहवालानुसार, आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनी सध्या 10,040.89 कोटी रुपये मूल्याची मालमत्ता व्यवस्थापित करत आहे. या कंपनीने मागील आर्थिक वर्षात 218.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांना मागील आर्थिक वर्षात एकूण 19248 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. ही कंपनी भारतात 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशात 391 जिल्ह्यांमध्ये 1684 शाखा चालवते.

आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीच्या IPO चा आकार 1500 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये सध्या 15784 कर्मचारी आहेत. आतापर्यंत या कंपनीने एकूण 32 लाख लोकांना 19,248 कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीने SEBI कडे IPO साठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स दाखल केला होता.

आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीचे 95 टक्के भाग भांडवल मणप्पुरम फायनान्स कंपनीने धारण केले आहे. उर्वरित 5 टक्के वाटा आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीच्या संस्थापकानी धारण केला आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीने फेब्रुवारी 2015 मध्ये आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीचे 71 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. नंतर जून 2022 मध्ये कंपनीने आपली गुंतवणूक 95 टक्केपर्यंत वाढवली.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO GMP of Asirvad Microfinance Ltd 02 May 2024.